प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तरुणांकडून रस्ता सफाई

उरण : उरण तालुक्यातील पिरकोण-वशेणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, खडी, मुरुम पडल्याने या रस्त्यावरुन दुचाकी, रिक्षा घेऊन जाणेही कठीण बनले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा उपाययोजना होईल याची वाट न बघता सारडे गावातील नितीन म्हात्रे, त्रिजन पाटील आणि पाले गावातील हरिश म्हात्रे यांनी स्वतः पुढाकार घेऊन नुकतीच श्रमदानाने सदर रस्त्याची साफसफाई केली. त्यांच्या या समाजाभिमुख कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते नागेश म्हात्रे आणि प्रवासी नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

उरण, पनवेल तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ बरोबर माती, खडी, मुरुम भरलेले डम्परची अवैधरित्या वाहतूक राजरोसपणे रात्री-अपरात्री सुरु असते. अशा वाहनांमधील माती, खडी, मुरुम रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावर पडल्याने दुचाकीला आणि इतर वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या अपघातात निष्पाप नागरिकांचा नाहक बळी जातो. या सर्व घटनेची दखल, स्थानिक ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, तहसील कार्यालय तसेच संबंधित प्रशासन घेत नसल्याने उरण तालुक्यातील सर्रास रस्त्यावर माती, खडी, मुरुम पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

उरण तालुक्यातील पिरकोण-वशेणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, खडी, मुरुम पडल्याने या रस्त्यावरुन दुचाकी, रिक्षा घेऊन जाणेही कठीण बनले होते. सारडे गावातील नितीन म्हात्रे, त्रिजन पाटील आणि पाले गावातील हरिश म्हात्रे यांनी अपघाताला कारणीभूत ठरु पाहणाऱ्या सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःच पुढाकार घेऊन नुकतेच श्रमदान करून सदर रस्त्याच्या साफसफाईचे काम हाती घेतले आहे.

आज तालुक्यातील रस्त्यावर कडेला झाडे झुडपे वाढली आहेत. सर्रास रस्त्यावर माती, खडी, मुरुम पडलेले आहे. शासन रस्ते स्वच्छ करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे काम करते. पण, कोणत्याही खात्याचे प्रशासकीय अधिकारी जनहितार्थ कामे करत नाही. त्यामुळे तरुणांना नाईलाजाने हातात झाडू घेऊन जनहितार्थ कामे करावी लागत आहे. तालुक्यातील रस्ते साफ करण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा.

-नागेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ता, सारडे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको भवन येथे सावित्रीमाई फुले जयंती साजरी