बेलापूर न्यायालयाच्या न्या. प्रीती श्रीराम यांना पीएच.डी. पदवी प्रदान
नवी मुंबई : बेलापूर न्यायालयात कार्यरत असलेल्या न्या. प्रीती श्रीराम यांना जळगाव येथील कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
"साईबर लॉज विथ रेफरन्स टू एडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक एविडेंस इन इंडिया : सोशिओ लीगल स्टडी" या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी. मिळविली आहे. या संशोधनासाठी जळगाव येथील एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या सहयोगी प्रा. डॉ. रेखा पहुजा यांनी मार्गदर्शन केले. तसेच पुणे येथील अड. गणेश शिरसाट, त्यांचे वडील अशोक श्रीराम, मातोश्री निर्मला श्रीराम तसेच आर्किटेक्ट संजय खरात (पती) यांचे मोलाचे सहकार्य न्या. श्रीराम यांना लाभले.
न्या. प्रीती श्रीराम यांच्या यशाबद्दल ठाण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच नवी मुंबई न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. व्ही. मराठे (न्यायाधीश-१), एम. आर. मांडवगडे (न्यायाधीश-२), पी. ए. साने (न्यायाधीश-३) तसेच सर्व न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.