प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न

नवी मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या सामान्य शाखेच्या  अपर आयुक्त फरोग मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली  विभागीय आयुक्त कार्यालय समिती सभागृहात संपन्न झाली.

कोकण विभागीय स्तरावरील भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ 26 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 09.15  वाजता साजरा होणार आहे.  मुख्य शासकीय ध्वजारोहण कळंबोली सेक्टर-17 येथील पोलीस मुख्यालय मैदानावर होणार आहे. त्यानुषंगाने बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमती मुकादम यांनी कोकण भवनातील सर्व विभागाने हा सोहळा यशस्वीरित्या व उत्साहात साजरा करण्याबाबत सूचना दिल्या.  प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी आणि हा कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे सांगून सर्वांनी शासकीय पोशाखात कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

या बैठकीत पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कोकण विभागातील विविध शासकीय विभागांचे  अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या शाळा क्र.९ च्या नवीन वास्तुचे लोकार्पण