‘सिडको'चा १४,१३० कोटींचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई : ‘सिडको'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी २८ मार्च रोजी ‘सिडको'चा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह गृहनिर्माण, नैना, मेट्रो, इंटरनॅशनल एज्युसिटी आणि पाणीपुरवठा योजना अशा विविध प्रकल्पांसह २०२५-२६ साठी सर्वाधिक १४,१२० कोटी रुपये खर्च आणि  १४,१३० कोटी रुपये जमेचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

‘सिडको'ने वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प सादर करत भविष्यासाठी आव्हानात्मक उद्दिष्ट रचले आहे. नगरविकास क्षेत्रातील अग्रणी प्राधिकरण म्हणून ५५ वर्षांची‘सिडको'ची यशस्वी वाटचाल राहिली आहे. शहर निर्मितीचा ध्यास घेतलेल्या ‘सिडको'ने आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. विकासासाठी कटीबध्द असणाऱ्या ‘सिडको'ने नवी मुंबईसह सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा अधिक पारदर्शक आणि सुलभ पध्दतीने मिळाव्यात याकरिता ‘ई-प्रशासन'चे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य केले आहे.

या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र), इंटरनॅशनल एज्युसिटी, मेट्रो प्रकल्प, पाणी पुरवठा योजना, ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट, उलवे कोस्टल रोड, खारघर-तुर्भे लिंक रोड, रेल्वे, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क आणि नवीन शहर प्रकल्प यासारख्या प्रकल्पांसाठी १४,१२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, भूतकाळावर नजर टाकली असता, आजपर्यंत ‘सिडको'ने अनेक आव्हाने यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्याच जबाबदारी आणि उत्तरदायित्वाच्या मोठ्या भावनेसह देशाच्या विकासाप्रती २०२५-२६ साठी सव्रााधिक १४,१२० कोटी (खर्च) आणि १४,१३० कोटी (जमा) असणार अर्थसंकल्प सादर केला आहे. ‘सिडको'च्या अर्थसंकल्पातील पारदर्शकता, उत्तरदायित्व, उत्तम लेखांकन प्रथा आणि कामगिरी या तत्त्वांद्वारे राज्याची आणि महामंडळाची प्रगती साध्य करण्याचे ‘सिडको'चे उद्दीष्ट सुस्पष्ट होत आहे, असे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.  

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, मेट्रो, इंटरनॅशनल एज्युसिटी, महागृहनिर्माण योजना, आदि ‘सिडको'चे प्रकल्प महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसोबतच नवी मुंबईतील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इतर योजना जसे की कनेक्टिव्हिटी आणि पाणीपुरवठा यासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १४,१२० कोटी रवकमेची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सदर प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल आणि सामान्य नागरिकांना दिलासा देखील मिळेल.
-विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

सिडको अर्थसंकल्प २०२५-२६ अंदाज (खर्च) दृष्टीक्षेपः
प्रकल्प रक्कम (कोटी)
सामान्य अर्थसंकल्प ६८६८.४६
गृहनिर्माण ३२५१.३८
मेट्रो ६२५.४८
पाणी पुरवठा ११२०.५०
रेल्वे ६५३.६३
नैना ५२७.१३
नवी शहरे १०७३.४२
एकूण १४,१२० 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वादळी वाऱ्यासह अवकाळीचा कहर