कंत्राटी सफाई कामगारांना कामावरुन काढले

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या जवळपास ५० सफाई कामगारांना ९ ऑवटोबर रोजी तडकाफडकी कामावरुन काढण्यात आले. यानंतर ‘मनसे'ने आक्रमक पवित्रा घेत काम बंद आंदोलन सुरु करत केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली.

यावेळी मनसे पदाधिकार्यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जाब विचारला. केडीएमसी अधिकाऱ्यांची हिटलरशाही मनसे खपवून घेणार नाही. कामावरुन काढून टाकलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घ्या; अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी ‘मनसे'च्या वतीने देण्यात आला. दरम्यान, ‘केडीएमसी'ने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ‘मनसे'ने आंदोलन मागे घेतले.

यावेळी ‘मनसे'चे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, महाराष्ट्र उपाध्यक्ष कामगार सेना राजेश उज्जैनकर, कार्याध्यक्ष रोहन आक्केवार, महिला सेना उपाध्यक्ष उर्मिला तांबे, महिला शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका कस्तुरी देसाई, शाखा अध्यक्ष संदीप पंडित तसेच महाराष्ट्र सैनिक आणि शेकडोंच्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली