प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
ठाण्यात मजिवड्यातील ‘वेलंकनी' इमारतीचा स्लॅब कोसळला
ठाणेः मजिवडा येथील फातिमा चर्च जवळ असलेल्या ‘वेलंकनी' या ३० ते ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना २ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत ७० ते ७५ वर्षीय कीर्ती कवीलकर या वृद्ध महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिकेने ही धोकादायक इमारत तातडीने पूर्णपणे रिकामी करून सील केली आहे.
तळ अधिक तीन मजले असलेल्या वेलंकनी बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर रूम नं. १०३ मधील विवेक कवीलकर यांचा स्लॅब अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ही इमारत ‘सी२अ ' प्रवर्गात (दुरुस्तीयोग्य पण रिकामी करण्यायोग्य) येत होती. मात्र, स्लॅब पडल्यामुळे इमारतीचा उर्वारित भागही धोकादायक झाला आहे. या इमारतीत एकूण १२ सदनिका असून त्यात अंदाजे ४० ते ४५ रहिवासी वास्तव्यास होते. त्यापैकी १२ ते १५ रहिवाशांची तात्पुरती राहण्याची सोय मजिवडा येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ४७ मध्ये करण्यात आली आहे. इतर रहिवाशांनी स्वतःची पर्यायी व्यवस्था केली आहे. इमारत पूर्णपणे सीलबंद करण्यात आली असून, पुढील कारवाई मजिवडा प्रभाग समिती आणि ठा.म.पा. बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.