‘बाल स्नेही पुरस्कार' समतोल फाउंडेशन, ठाणे यांना प्रदान

ठाणेः महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आयोजित ३ मार्च रोजी पार पडलेल्या बाल-स्नेही पुरस्कार २०२४ पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ‘समतोल फाउंडेशन ठाणे' या संस्थेसाठीचा बाल स्नेही पुरस्कार पुरस्कार आमदार संजय केळकर, फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव व समतोल फाउंडेशनचे विश्वस्त रविंद्र औटी यांनी स्वीकारला.

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संघटना शासकीय अधिकारी, तसेच सेवाभावी यंत्रणा आणि संघटनांचा यावेळी सन्मान करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे, गृहराज्यमंत्री पंकज भोयार, राज्य महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरीकर बोर्डीकर, विधान परिषद आमदार श्रीमती मनीषा कायंदे, महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोग अध्यक्ष श्रीमती सूशिबेन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुुरस्कार वितरण सोहळा पार पडला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्या 3 डंपर चालकावर कारवाई