कर्नाळा खिंडीत बस पलटी

नवीन पनवेल : मुंबई-गोवा हायवे कर्नाळा खिंड, बालाजी किचन हॉटेलजवळ ओमकार ट्रॅव्हल्स या खाजगी कंपनीची लक्झरी बस पलटी झाल्याने अपघातात एकाचा प्रवाशाचा मृत्यू झाला, तर तब्बल ३२ प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी बस चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची दहिसर येथून सावंतवाडीला जाणारी लक्झरी बस (क्र. एमएच-४७ वाय-७४८७) प्रवाशांना घेऊन ४ मे रोजी पनवेल येथून पुढे मार्गस्थ झाली होती.

यावेळी रात्री ११ च्या सुमारास गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत भरधाव वेगातील सदर बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यातच पलटी झाली. या अपघातात अमोल कृष्णा तळवडेकर (वय ३०, राहणार कोंडाये, राजापूर) याचा मृत्यू झाला, तर इतर ३२ प्रवासी जखमी झाले. यात शंकर नारायण सावंत, लक्ष्मी गजानन घुणरे, सुरेखा रवींद्र सावंत, अबीठा पराग सावंत, रीना राजेंद्र साळस्कर, राजेंद्र अर्जुन साळस्कर, सानिया राजेंद्र साळस्कर, समर्थ संजय साळस्कर, संजय सिताराम साळस्कर, जयश्री विश्वास साळस्कर, सिताराम नारायण साळस्कर, सुनील रामचंद्र धुरी, परेश रमाकांत धुरी, रुपेश रमाकांत धुरी, संदेश महादेव धुरी, दुर्गा भरत शेटकर, भरत कट्टी शेटकर, भारती भरत शेटकर, आर्या भरत शेटकर, स्नेहा श्याम गावकर, प्रमोद रामचंद्र चव्हाण, प्रणाली प्रमोद चव्हाण, उज्वला गणपत बोडेकर, कल्पेश गणपत बोडेकर, शशिकला शिवराम परब, नाविन्या मयूर सावंत, नलिनी काशिनाथ पवार, सुनील सिताराम ओनकर, रोशन सदाशिव गमरे, सागर चंद्रकांत कदम, रोहित रमेश तरळ, रुतिका रोहित तरळ उर्फ प्रतिक्षा रविकांत मटकर असे प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच लहान मुलीच्या हातावर तातडीेने शस्त्रक्रिया देखील करण्या आली आहे.

दरम्यान, सदर अपघातानंतर पळून गेलेल्या बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

साठेनगरमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य