१२ एप्रिल रोजी ठाणे मध्ये प्रथमच ‘कोकणची लोकधारा'

ठाणे : कोकणातील संस्कृती, परंपरा यांचे जतन व्हावे, संवर्धन व्हावे, या उद्देशाने बारटक्के फाऊंडेशन प्रस्तुत, सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ, ठाणे आणि जनार्दन सीताराम घुगरे स्मृती वृध्दाश्रम, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरात प्रथमच ‘कोकणची लोकधारा... प्रथा... परंपरेचा मानबिंदू...!' या कलाविष्काराचे सादरीकरण येत्या १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ठाणे शहरातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यथोचित गौरव केला जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक तथा ‘बारटक्के फाऊंडेशन'चे अध्यक्ष दिलीप बारटक्के यांनी दिली.

या कार्यक्रमात ‘ओएनजीसी'चे डीजीएम व्ही. सी. म्हात्रे यांना जीवन गौरव पुरस्कार २०२६, ‘ सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय'चे अध्यक्ष कमलेश प्रधान, ठाणे येथील ‘कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय'चे अध्यक्ष सचिन मोरे, ‘डॉक्टर प्लॅनेट'चे संचालक अतुल वालावलकर, ‘संकल्प इंग्लिश स्कूल'चे अध्यक्ष डॉ. शंकर (राज) परब यांना कोकण भूषण पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात येणार आहे. तर ‘केआयएमएस'चे क्षेत्रीय संचालक सौरव गुप्ता यांना विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी सेलिब्रेटींचे विशेष आकर्षण असणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून, या कार्यक्रमात सूत्रसंचालन जान्हवी सावंत करणार आहेत. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमातील नृत्य प्रकार
कोकणातील बारा पाचाचे गाऱ्हाणे ( सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ, ठाणे), लग्न गीत नृत्य आणि तुळशी विवाह ( स्वा. सावरकर कला मंच, ठाणे), कुणबी नृत्य (जल्लोष ग्रुप, लोककला अभ्यासक पंकज पाडाळे), संकासूर आणि पालखी (तिरवडे तर्फे खारेपाटण - वैभववाडी,  सखाराम घुगरे आणि ग्रुप), नमन ( मुद्रा आर्ट अकादमी, ठाणे, अध्यक्ष - माया सावंत), आदिवासी तारपा नृत्य (सुलोचना बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अध्यक्ष - नताशा सोनकर), बाल्या नृत्य (एफ टी एफ डान्स ग्रुप, विकास बोहित), मंगळागौर नृत्य (मैत्रीण गटः स्नेहा रवंदे, रागिणी साने, अंजली निकम, अमित शेलार), दशावतार ( मुंबई दशावतार कंपनी, गौतम कदम, गणेश मुणगेकर), कोकण महोत्सव गीत नृत्य (स्वा. सावरकर कला मंच, विद्या डान्स अकादमी) 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश