गटासाठी राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यशस्वी आठ वर्षे पुर्ण केली आहे. या कालावधीत सरकराने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करुन त्यांचा लाभ जनतेला दिला. त्यामुळे या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यत्त पोहचाव्यात याकरीता भाजपच्यावतने सेवा सुशासन आणि गरिब कल्याण पर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या नेतृत्वाखाली खांदा कॉलनी मधील भाजपच्या कार्यालयात महिला बचत गटासाठी राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.
 
         खांदा कॉलनी मधील सेक्टर १ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सेवा सुशासन आणि गरिब कल्याण पर्व कार्यक्रम बुधबारी राबवण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत समाजातील वंचित घटक व शहरी भागातील गरीब लोकांची भेट घेण्यात आली. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने यशस्वीपणे आठ वर्ष पुर्ण केल्यानिमीत्त राबवण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरीकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरे, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालये, अन्न सुरक्षा योजने अंतर्गत मोफत अन्नधान्य, उज्वला योजने मार्फत मोफत गॅस कनेक्शन तसेच ई- श्रमीक कार्ड योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनांची माहिती तसेच महिला बचत गटांना पंतप्रधान मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनाची माहिती देण्यात आली. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सिता पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारूशीला घरत, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्षा राखी पिंपळे, पनवेल शहर महिला मोर्चा उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे, नीता माळी, खांदा कॉलनी महिला मोर्चा सरचिटणीस आशा मुंडे, खजिनदार आदिती मराठे, स्नेहल खरे, नीता मंजुळे, अंजली इनामदार, सानिका इंदुलकर, मनीषा पाटील, संध्या जाधव, प्रेमा भोपी, सोनाली सावंत, शैला मोरे, सीमा निकम, मनीषा कोळी, सुनीता चव्हाण, सविता खराते, अरुणा खरात, माधुरी अवचटकर यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
 
 
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेलमध्ये भाजप अनुसूचित जाती मोर्चाचा मेळावा उत्साहात