‘मनसे’चे महापालिकेवर ढोल वाजवा आंदोलन
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ११ मार्च रोजी ‘मनसे मनपा कामगार कर्मचारी सेना’तर्फे महापालिका मुख्यालयावर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. ‘मनसे मनपा कामगार
कर्मचारी सेना’चे राज्य अध्यक्ष तथा ‘मनसे’चे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृव्त्वाखाली सदर मोर्चा सीवुडस् मधील मनसे मध्यवर्ती कार्यालय ते महापालिका मुख्यालय असा
काढण्यात आला. या मोर्चात हजारो कामगार सहभागी झाले होते. यामध्ये कोव्हीड मुळे मÀत्यू झालेल्या कामगारांचे कुटुंबियांचा सहभाग होता.
‘मनसे युनियन’ने ’कायम’ कामगारांप्रमाणे, कंत्राटी कामगारांना देखील समान काम समान वेतन लागू करण्यासाठी ९ एप्रिल २०२१ रोजी सर्वप्रथम मागणी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. परंतु, त्यात एकाही कामगार संघटनेच्या प्रतिनिधीला घण्यात आले नाही. यामध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय न घता केवळ वेळकाढूपणा करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत चालू आहे. तसेच कोरोना मुळे मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना २८ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केल्यानुसार क वर्ग महापालिकेतील कामगारांसाठी ५० लाख रुपये आणि नवी मुंबई महापालिकेने मंजूर केलेले ५ लाख
रुपये अद्यापही देण्यात आलेले नाहीत किंवा त्याबाबतचा प्रस्तावही महापालिकेने शासनाकडे पाठवलेला नाही. त्यामुळे मृत्यू पावलेल्या कंत्राटी कामगारांबाबत महापालिका प्रशासन असंवेदनशील आहे. कोरोना काळामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महापालिका कंत्राटी कामगारांना २३ मार्च २०२० ते ३१ मे २०२० या कालावधीमध्ये कोरोना भत्ता प्रतिदिन ३०० रुपये मिळावा अशी मागणी केली असताना फक्त एका बाजूला कायम कामगारांना कोरोना भत्ता देण्यात आला आहे. मात्र, कंत्राटी कामगारांच्या बाबतीत सदरचा दुजाभाव आयुक्त करीत असल्याचा आरोप ‘मनसे’चे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी यावेळी केला.
सदर मागण्यांबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे वारंवार निवेदने करुनही प्रत्यक्षात याची अंमलबजवाणी होत नसल्यामुळे ‘मनसे’ने ढोल वाजवा आंदोलन करुन धडक मोर्चा काढल्याचे गजानन काळे यांनी सांगितले. दरम्यान, सदर मोर्चा महापालिका मुख्यालयार्पयंत पोहोचल्यानंतर ‘मनसे’च्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घऊन मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी आयुक्तांनी ‘मनसे’च्या मागण्या मान्य करत
कोव्हीडमुळे मृत १३ कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना येत्या दोन ते पंधरा दिवसांत महापालिकेतर्फे ५ लाख रुपये भरपाई देण्याचे मान्य केले. तसेच राज्य शासनाला देखील या मृत कामगारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी तात्काळ अहवाल पाठवणार आहे. तसेच समान काम समान वेतन या मागणीबाबत अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत कामगारांचे प्रतिनिधी देखील घतले जातील, असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे गजानन काळे म्हणाले.
दरम्यान, जर सदर मोर्चा नंतर देखील महापालिका प्रशासनाला जाग आली नाही, तर कोरोना मुळे मृत पावलेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांसमवेत आयुक्त अभिजित बांगर यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा थेट इशारा
‘मनसे’चे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावेळी दिला.