आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांचा परस्पर समन्वय महत्वाचा -जिल्हाधिकारी जावळे
पनवेल मधील शिवसैनिकांनी घेतली पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट
खारघर : पनवेल विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेना पदाधिकारी, महीला आघाडी, युवासेना व युवतीसेना पदाधिकारी असे जवळपास दिडशेहुन अधिक शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केल्यानंतर शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले असून शिवसेनेत दोन गट पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र पनवेल तालुका खंदे शिवसैनिक शिवसेनेत ठाण मांडून आहे. त्यामुळे गुरुवार ता.14 रोजी पनवेल महानगरपालिका, पनवेल तालुका आणि ग्रामीण भागातील जवळपास दिडशेहुन अधिक शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले की तुमचे प्रेम असेच राहू द्या. येणाऱ्या संकटाला तोंड देण्याची हिम्मत शिवसेनेत आहे. तुमचे प्रेम पाहून समाधान वाटत आहे. तर उपस्थित शिवसैनिकानी आपल्या सोबत आहोत असा निर्धार केला.
जिल्हा प्रमुख शिरीष घरत म्हणाले पनवेल मधील शिवसैनिक शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी साहेब काळजी करू नका, पनवेल परिसरातील शिवसैनिक आपल्या बरोबर आहे असे सांगितले.