ठाणे महापालिका कलावंत जपणारी - अतिरिक्त आयुक्त माळवी

ठाणेः ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी-अधिकारी सुध्दा चांगले लेखक, गायक, कवी आहेत. तसेच ठाणे महापालिका नेहमीच कलेचा आदर करीत आली आहे. कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले.

ठाणे महापालिकातर्फे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच श्रृंखलेतील कवीसंमेलन २७ जानेवारी रोजी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त-१ संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले.

पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून ‘न्यूजलेस कविता' असा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमुला या निमित्ताने काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. गझलकार सुनील तांबे, वृत्तनिवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी, पत्रकार कवी सुरेश ठमके, पंकज दळवी आणि प्रशांत डिंगणकर यांनी कवी संमेलनात  कविता सादर केल्या. गिरणगावातील कामगारांचा आवाज असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने त्यांचे स्मरण करुन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन कवी संमेलन संपन्न झाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दुर्गाडी किल्ला येथे नागाला जीवदान