ठाणेकरांचा प्रवास पुन्हा विस्कळीत

मेट्रो कामाचा फटका

ठाणेः ठाणे शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या घोडबंदर रोडवर आज सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मेट्रो-४ प्रकल्पाचे काम आणि मुख्य नाक्यांवरील वाढती वाहनसंख्या यामुळे प्रवाशांना कामावर जाताना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासूनच घोडबंदर रोडवरील कापूरबावडी, मानपाडा आणि पातलीपाडा या भागांत वाहनांचा वेग मंदावला होता. अवजड वाहनांची वर्दळ आणि मेट्रोच्या खांबांसाठी करण्यात आलेल्या बॅरिकेडिंगमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, त्यात भर म्हणून सकाळी कार्यालयात जाणाऱ्यांची गर्दी वाढल्याने वाहतूक संथ झाली.मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाकडून काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मार्गात बदल (ग्नीूे) करण्यात आले आहेत. मात्र, या बदलांची पुरेशी माहिती नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, यामुळे मुख्य चौकांमध्ये वाहनांची कोंडी होत असल्याच दिसत होते.

मेट्रो कामामुळे रस्ते अरुंद झाले असून पीक अवरमध्ये   ही समस्या अधिक उग्र रूप धारण करते.  माजिवडा आणि कापूरबावडी जंक्शनवर ठाणे, मुंबई आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांचा संगम होत असल्याने येथे सव्रााधिक कोंडी होत आहे.  काही अंतर्गत रस्त्यांवरून वाहतूक वळवल्याने त्या भागातील स्थानिक रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुरबाड मध्ये वादळी वाऱ्याचा हाहाकार