प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
रानसई, बारापारा जंगल परिसरात बिबट्याचा वावर
उरण : उरण तालुक्यातील रानसई, बारापाडा जंगल परिसरात बिबट्याचा वावर चलचित्रीकरण कॅमेऱ्यात आढळल्याने या परिसरात वन विभागाने सुरक्षिततेसाठी बँनर बाजी करुन गस्त सुरु केली आहे. तसेच परिसरातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत. मात्र, मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
जंगल परिसरात वाढते अतिक्रमण, सतत लागणारे वणवे यामुळे वन्यप्राणी अन्नाच्या शोधात नागरी वस्तीत येऊ लागले आहेत. त्यातच उरण तालुक्यातील रानसई, बारापाडा जंगल परिसरात बिबट्याचा वावर चलचित्रीकरण कॅमेऱ्यात आढळल्याने नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत. मात्र, याहीवर्षी बिबट्याचा वावर आढळल्याने रानसई ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रानसई ग्रामपंचायत १०० टक्के आदिवासी बांधवांची लोकवस्ती असलेली ग्रामपंचायत आहे. येथील नागरिकांच्या उपजीविकेचे साधन जंगल आहे. अशा जंगल परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन बिबट्याला जेरबंद करावे.
-राधा मधुकर पारधी, सरपंच-रानसई.