गिरिजेश रजक हिची रशियामध्ये सुवर्ण कामगिरी

कल्याण : वर्ल्ड रॉ पॉवरलिपटींग फेडरेशन मार्फत रशियातील मॉस्को येथे वर्ल्ड पॉवरलिपटीग चॅम्पियनशिप नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कल्याणच्या गिरिजेश रजक हिने पूर्ण पॉवरलिपटीगमध्ये सुवर्ण पदक, बेंच प्रेसमध्ये सुवर्ण पदक आणि डेडलिपट या प्रकारात सुवर्ण पदक असे ३ सुवर्ण पदक मिळविण्याची कामगिरी केली आहेे.

सदर स्पर्धेमध्ये जागतिक पातळीवरील विविध देशांच्या खेळाडुंनी सहभाग घेतला होता. चीन, जपान, कोरिया, भारत, दुबई, साऊथ आफ्रिका असे अनेक देश सहभागी झाले होते. गिरिजेश रजक आंबिवलीच्या अल्फा जीममध्ये सराव करत असून तिला प्रशिक्षक सोनू पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'ची प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम