प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात कार्यशाळेचे आयोजन
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे या नेहमीच गोरगरिबांच्या सेवेसाठी कार्यतत्पर असतात. त्यामुळे दिनदुबळ्यांची सेवेकरी म्हणून आमदार मंदाताई म्हात्रे यांची नवी मुंबईमध्ये ओळख आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन विषयक विविध प्रश्न, धोरणे आणि उपाययोजना यावर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी, सांयकाळी 6 वाजता. स्थळ :- सुनिल गावस्कर मैदान, सेक्टर – 1, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे “विशेष कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांशी संबंधित शासकीय अधिकारी, तज्ञ, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांचा सहभाग अपेक्षित असणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रश्न, तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या यावर मार्गदर्शन करण्यात येणार असून, प्रभावी आणि शाश्वत उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच, पुनर्वसन प्रक्रियेतील पारदर्शकता, गती आणि नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. या कार्यशाळेमुळे संबंधित सर्व घटकांना एकत्र आणून झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला.
सदर कार्यशाळेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.