प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘भाजपा'च्या ४६व्या स्थापना दिनानिमित्त बेलापूर विधानसभा मतदारसंघात ध्वजारोहण
नवी मुंबई : दारासमोर ‘कमळ'ची रांगोळी आणि घरावर ‘भारतीय जनता पार्टी'चा ध्वज उभारुन कार्यकर्त्यांनी ‘भाजपा'चा ४६वा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी भाजपा नेते महामंत्री निलेश म्हात्रे यांनी दिवाळे गाव मध्ये संविधान फेरी काढून उत्साहात साजरा केला.
त्याग, समर्पण आणि सेवा भावनेतून ‘अंत्योदय' आणि सक्षम राष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी कटिबध्द असलेला जगातील सर्वात मोठा पक्ष ‘भारतीय जनता पार्टी'चा स्थापना दिन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या गौरव निवासस्थानी आणि दिवाळे गाव येथे भाजपा नेते महामंत्री निलेश म्हात्रे तसेच भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी संविधान फेरी काढून आणि ध्वजारोहण करुन उत्साहात साजरा केला. ‘भारतीय जनता पार्टी'च्या स्थापना दिवसानिमित्त ‘भाजपा'चे महान संस्थापक, सदस्य, नेते आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचे आभार ज्यांच्या अमुल्य तागा, प्रेरणादायी नेतृत्त्व आणि कठीण परिश्रमाने भारतीय जनता पक्षाला केवळ भारतात नव्हे तर विश्वातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा गौरव प्राप्त केला आहे. भाजपा स्थापना दिवशी म्हणजे ६ एप्रिल १९८० रोजी ‘भाजपा'ची स्थापना झालेली होती. सुरुवातीला जनसंघ म्हणून ओळख असलेला पक्ष नंतर भारतीय जनता पक्ष नावाने उदयाला आला आहे. ‘भाजपा'ने ६ एप्रिल रोजी महाराष्ट्रासह देशपातळीवर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच प्रत्येक जिल्हा, विभागामध्ये, बूथ स्तरावर ध्वजारोहण तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले होतेे.
यावेळी भाजपा नेते महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक दिना पाटील, जेष्ठ कार्यकर्ता गोपाळराव गायकवाड, मंडल अध्यक्ष अजय सिंग, भूषण कोळी, मनीष बिजलानी, जयदेव ठाकूर, निलेश पाटील, ज्ञानेश्वर कोळी, कैलास कोळी, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अध्यक्ष चंद्रकांत कोळी, ‘डोलकर मच्छिमार संस्था'चे अध्यक्ष तुकाराम कोळी, ‘खांदेवाले मच्छिमार संस्था'चे अध्यक्ष रमेश हिंडे, ‘फगवाले मच्छिमार संस्था'चे अध्यक्ष अनंता बोस तसेच असंख्य आजी-माजी भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.