केडीएमसीच्या तिजोरीच्या चाव्या मल्लेश शेट्टी यांच्याकडे 

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर महिला बालकल्याण समितीसाठी शिवसेनेच्या नगरसेविका सारिका जाधव  आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपाच्या अभिजीत थरवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या उमेदवारांनी २ एप्रिल  रोजी आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केली होती. केडीएमसी मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात ६ एप्रिल रोजी या तिन्ही सभापती पदांसाठी निवडणूक अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शिवमंदिर सुशोभीकरण विस्थापितांचे पुनर्वसन करा!