२७ गावांमध्ये चर्चा तर होणारच!

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रांतील २७ गावांमध्ये क्लस्टर योजना राबविण्यात येणार असून या ‘क्लस्टर योजना'ला येथील नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत ‘सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती'ने एल्गार पुकारला असून चर्चा तर होणारच, या कार्यक्रमाच्या माध्यमातून २७ गावांतील प्रत्येक गावांमध्ये ‘वलस्टर योजना'विरोधात जनजागृती केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून सोनारपाडा येथील साई बाबा मंदिरात ‘जनजागृती सभा'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत कशाप्रकारे क्लस्टर योजना २७ गावांवर लादून येथील भूमीपुत्रांना भूमिहीन करण्याचा डाव असल्याचे सांगण्यात आले.

क्लस्टर योजना रद्द न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा ‘संघर्ष समिती' अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे. यावेळी ‘समिती'चे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे, सुमित वझे, रतन पाटील, रामचंद्र पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, संदीप पालकरी, राहुल जाधव, विठ्ठल वायले, तुळशीराम पाटील, हरिश्चंद्र राणे, तकदीर काळन, नगरसेवक  महेश पाटील, जालिंदर पाटील, कैलास जोशी, निलेश खांबायत, माजी नगरसेवक  गणेश  भाने, संदीप माळी, संतोष केणे आदिंसह सर्वच राजकीय पक्षांचे, इतर अनेक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.  

‘वलस्टर'मुळे पूर्ण गावंच्यागाव उध्वस्त होणार आहेत. याबाबत केडीएमसी आयुक्तांना निवेदने दिली, मोर्चा देखील काढला. त्याअनुषंगाने गावांमध्ये जनजागृती होण्यासाठी सभा लावली होती. जोपर्यंत २७ गावांची स्वतंत्र महापालिका होत नाही, तोपर्यंत ‘वलस्टर'चे भूत आपोआप उडून जाईल. यासाठी आमची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढणार आणि आमचा विजय होणार, असा विश्वास सत्यवान म्हात्रे यांनी व्यक्त केला.

‘केडीएमसी'मध्ये आपल्या मर्जीविरुध्द २७ गावांना समाविष्ट केले आहे. याविरोधात सर्वपक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समिती लढा देत आहे. या ‘समिती'च्या नेत्तृत्वात नुकतेच केडीएमसी मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले. यामध्ये क्लस्टर आणि कर या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावर सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांसह बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ‘वलस्टर योजना'बाबत माहिती देण्यासाठी २७ गावातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांना या सभेसाठी बोलविण्यात आले होते. २७ गावात क्लस्टर योजना नसल्याच्या अफवा पसरविण्यात येत होत्या. मात्र, ‘वलस्टर योजना'चे शासन परिपत्रक आणि नकाशे नागरिकांना दिले असून या अफवा पसरविणाऱ्यांना उत्तर जनताच देणार आहे. या सभेबाबत चर्चा तर होणारच, अशी जाहिरातबाजी २७ गावांमध्ये करण्यात आली होती. चर्चा तर होणारच असा ‘संघर्ष समिती'चा नवा अध्याय असून यामाध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार असल्याचे सुमित वझे यांनी सांगितले.      

क्लस्टर योजना झोपडपट्टी भागासाठी असते. मात्र, २७ गावांत सरसकट क्लस्टर योजना लादली  आहे. यामध्ये जबरदस्ती जागा अधिग्रहण केली जाणार असून या ‘वलस्टर योजना'ला विरोध असून याबाबत महापालिकेत देखील विरोध केला जाणार असून, कायदेशीर लढाई लढू. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरुन देखील लढाई लढणार.
-महेश पाटील, नगरसेवक-भाजपा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

करवाढ नसणारा ‘ठामपा'चा ६२२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर