नाईकांचे विधान, नवी मुंबईत राजकीय 'वाकयुध्द'

वाशीः ‘भाजपने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवून टाकेन,' असे वादग्रस्त ववतव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी करून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा ललकारले आहे. नाईक यांच्या ववतव्याने नवी मुंबईत वाकयुध्द रंगायला सुरूवात झाली असून नवी मुंबईतील शिवसेना नेते विजय चौगुले आता या वादात उतरले आहेत. ‘जी व्यवती माझे नामोनिशाण मिटवू शकली नाही, ती एकनाथ शिंदे यांचे नामोनिशाण काय मिटवणार,' असा प्रतिहल्ला चौगुले यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरोधात गणेश नाईक  असा कलगीतुऱ्याचा सामना नवी मुंबईत पहायला मिळणार आहे.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकांपूर्वीच नवी मुंबईत गणेश नाईक  विरुद्ध एकनाथ शिंद असा राजकीय  ‘सामना' रंगला होता.निवडणूक निकालानंतर हा वाद संपेल, असे वाटत असतानाच आता हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात बोलताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आक्रमक विधान केले आहे.

नवी मुंबईत ५७ जागांची मागणी होती

नवी मुंबईतील जागावाटपावर भाष्य करताना नाईक म्हणाले, ‘नवी मुंबईत शिवसेनेकडून ५७ जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र, आम्ही त्यांना २० ते २२ जागा देण्यास तयार होतो. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी एबी फॉर्म भरले आणि आम्हीही भरले. त्यानंतर जे झालं, ते चांगलंच झालं,' असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, ‘ठाण्यातील लोकांना अशी करामत करता आली नाही. ठाण्यात भाजपाच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. कल्याणमध्येही तसेच झाले. तरीही पक्षाला जे मान्य होते, ते आम्ही मान्य केले,' असे देखील गणेश नाईक यांनी म्हटले आहे.

‘भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे. एकदा आदेश दिला की तिथे इतर काही येत नाही,' असे सांगत नाईक यांनी ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांची परवड झाल्याचे स्पष्टपणे मांडले. 'हे मी बोलणार नाही, तर कोण बोलणार? तरीही कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळली, हे कौतुकास्पद आहे,' असेही त्यांनी नमूद केले. नाईक यांनी पुन्हा एकदा आपली जुनी भूमिका अधोरेखित करत सांगितले की, 'सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती, तर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून आले असते, त्यांना महापौर पदासह इतर प्रमुख पदे मिळाली असती. मात्र, हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत आहे.'

 'भाजपाने परवानगी दलिी तर नामोनशिाण मटिवू
भाजपाने परवानगी दिली, तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू. मी आज परत बोलतो आहे. एके काळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील, त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि उर्वारित पदांची वाटणी करावी, असे माझे मत होतेे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मी ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगितली होती. त्यांनी त्यावर होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. आम्हाला अपेक्षा होती की कार्यकर्त्यांना संधी मिळेल, मात्र काही ठिकाणी ती संधी मिळाली नाही. - गणेश नाईक, वनमंत्री.

 'माझे नाव मटिवू शकले नाही, शिंदेंना काय संपवणार?
यांच्यात (गणेश नाईक) काय दम आहे. माझे नाव मिटवू शकले नाही. ते एकनाथ शिंदे यांचे नामोनिशाण काय मिटवणार? आमचा टांगा पलटी करू असे ते म्हणाले, पण महापालिकेत आमचे ४२ नगरसेवक निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे हे अजूनपर्यंत एकही निवडणूक हारले नाहीत. पण जे दोनदा पराभूत झाले त्यांनी नवी मुंबई ही जहांगिरी आहे असे समजू नये. - विजय चौगुले, (शिवसेना शिंदे गट) 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

३ फेब्रुवारी रोजी केडीएमसी महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक