प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
'ठाकरे गट'तर्फे बेपत्ता नगरसेवकांच्या शोधासाठी पोस्टरबाजी
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'च्या मशाल चिन्हावर तब्बल ११ उमेदवार निवडून आले. यातील ४ नगरसेवक १६ जानेवारी रोजी मतमोजणीनंतर नॉट-रिचेबल आहेत. या बेपत्ता नगरसेवकांची माहिती मिळावी यासाठी कल्याण पूर्वेत ‘शिवसेना उबाठा'च्या पदाधिकाऱ्यांनी पोस्टरबाजी केली आहे.
मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे अशी बेपत्ता नगरसेवकांची नावे असून राजकीय घाडामोडी पार्श्वभूमीवर भाजपा ५०, शिवसेना शिंदे गट ५३, काँग्रेस २, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट १, मनसे ५ आणि शिवसेना उबाठा पक्ष ११ असे पक्षीय बलाबल आहे. सत्तासंुदरीच्या खुर्चीसाठी राजकीय गणिते, राजकीय समीकरण, राजकीय घाडामोडी नाट्य पाहता सदर नाँट रिचेबल नगरसेवकांची भूमिका काय? ते समोर आल्यानंतर नेमके कळेल. पंरतु, या बेपत्ता नगरसेवक प्रकरणी ‘शिवसेना उबाठा'ने नगरसेवकांचा शोध घ्यावा यासाठी पदाधिकाऱ्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
‘ठाकरे गट'चे नेते संजय राऊत यांनी पोस्टर लावून नगरसेवकांचा शोध घेण्याचा आदेश दिल्याने कल्याण पूर्वेतील ‘शिवसेना उबाठा'च्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर पोस्टर चिटकवून बेपत्ता नगरसेवक आढळल्यास त्याबाबतची माहिती कोळसेवाडी शिवसेना शाखेत घ्यावी अशी पोस्टर बाजी करीत मागणी केल्याने राजकीय घडामोडीत चांगलीच रगंत आली असल्याचे चित्र दिसत आहे.
‘शिवसेना उबाठा'चे युवासेना पदाधिकारी नीरज दुबे यांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर सांगितले की, ‘उबाठा'चे मधुर म्हात्रे, किर्ती ढोणे यांच्या बेपत्ता प्रकरणी पोस्टर लावून शोध घेत आहोत. सदर दोन्ही जण कल्याण पूर्वेतील असल्याने आम्ही आमच्या वतीने शोध घ्ोत असून कल्याण पश्चिमेतील ‘उबाठा'च्या २ नवनिर्वाचित नगरसेवक बेपत्ता प्रकरणात कल्याण पश्चिमेतील पदाधिकारी त्यांच्या पध्दतीने शोध घेत आहेत. ‘शिवसेना उबाठा'च्या बैठकीला या चारही बेपत्ता नगरसेबकांना हजर राहण्यासाठी मेल, व्हाँटस्अँपद्वारे मँसेज पाठवला आहे. गटनेता उमेश बोरगांवकर यांच्या ‘व्हीप'च्या अनुषंगाने त्यांना हजर राहणे बंधनकारक असून, गैहजर राहिल्यास कायदेशीर निलंबन कारवाईचा बडगा अटळ आहे.
तसेच ‘शिवसेना ठाकरे गट' नेते आ. वरुण सरदेसाई यांनी आम्ही विरोधी पक्षात बसू. तसेच कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ४ नगरसेवकांनी अद्याप कोकण आयुक्तांकडे नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आम्ही येत्या २-४ दिवसांत ‘व्हीप' बजावणार आहोत. या काळात जर सदर नगरसेवक गैरहजर राहिले, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल. आता या चारही नगरसेवकांनी ठरवायचे आहे की, त्यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि ‘मशाल' चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत निकालानंतर जर त्यांनी पक्ष आणि आपली भूमिका बदलली, तर पुढील ५ वर्षे ते मतदारांना कशा प्रकारे सामोरे जाणार? असे आ. सरदेसाई यांनी सांगितले. दरम्यान, या नाट्यमय राजकीय घडामोडी पाहता ‘केडीएमसी'मधील राजकीय नाट्य चांगलेच तापले असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.