एमआयडीसी निवासीतील नागरिक टाकणार मतदानावर बहिष्कार

कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील नागरिक वेगवेगळ्या समस्येने त्रस्त झाले आहेत. त्यात एक वेगळी अशी भयानक दुहेरी वासाची समस्या एकत्र त्यांच्यापुढे २ महिन्यांपासून सुरु झाल्याने ते हैराण झाले आहेत. पावसाळी गटारात शौचालयाचे मलमूत्र आल्याने नागरिक दुर्गंधीने त्रस्त असून या त्रस्त नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.  

एमआयडीसी निवासी मधील ४ बिल्डींग नावाने असलेला भाग अगदी रासायनिक कारखान्यांना लागून म्हणजे एमआयडीसी फेज-२ जवळ असलेला परिसर आहे. या भागातील पावसाळी गटारात २ महिन्यांपासून शौचालयाचे मलमूत्र आल्याने त्याचा तीव्र घाण वास येत आहे. विशेष म्हणजे येथील रहिवाशांनी सदर बाब येथील सर्व राजकीय पक्षांचा पदाधिकाऱ्यांना सांगून झाली आहे. तसेच केडीएमसी, एमआयडीसी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. एमआयडीसी आणि केडीएमसी या प्राधिकरणाचे अधिकारी याची पाहणी करुन गेले; पण कोणीही यावर कार्यवाही केली नाही.

सदर शौचालयाच्या मलमूत्र दुर्गंधीबरोबर येथील लागून असलेल्या रासायनिक कंपन्यांच्या विषारी वायू प्रदुषणाचा त्रास देखील अधूनमधून होत असल्याने येथील रहिवाशी या दुहेरी वास येण्याचा समस्येने हैराण झाले आहेत. सदर ४ बिल्डींग ओम सदिच्छा, ओमकार छाया, माणिकरत्न, गौरी नंदन' अशा गृहनिर्माण वसाहती असून त्यात ४८ कुटुंब राहत असून अंदाजे २०० मतदार येथे आहेत. या सर्व मतदार नागरिकांचे म्हणणे आहे की, शौचालय दुर्गंधी आणि रासायनिक प्रदुषणाची समस्या जोवर सुटत नाही, तोपर्यंत आम्ही येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.

दरम्यान हा प्रभाग क्रमांक 19 पॅनल मध्ये येत असून त्यातील अ, ब, क हे तीन वार्ड बिनविरोध झाले असून फक्त ड मधील जागेसाठी बीजेपी व मनसे यांच्यात सामना होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा दिव्याखाली अंधार!