प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
निवडणुकीसाठी ‘काँग्रेस'चा जाहीरनामा जाहीर
भाईंदर : ‘काँग्रेस'चे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार मुजपफर हुसेन यांनी मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी ‘काँग्रेस'चा जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. यावेळी प्रदेश निरीक्षक आनंद सिंग, जिल्हाध्यक्ष झुबैर इनामदार उपस्थित होते.
‘काँग्रेस'च्या जाहीरनाम्यात जलपुरवठ्याचा कायमस्वरुपी उपाय, खड्डेमुक्त रस्ते, मेट्रो प्रकल्पाची तातडीने पूर्तता, सक्षम बस वाहतूक व्यवस्था, टोल नाक्यांवरील सुलभ वाहतूक, वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन, भूमीगत गटार योजना, स्वच्छ भाजी मार्केट, पुरेशी पार्किंग सुविधा, आधुनिक आरोग्य सेवा आणि सार्वजनिक शौचालये यांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच महिला सक्षमीकरण, क्रीडांगणांचा विकास, सुदृढ कायदा-सुव्यवस्था, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण, पर्यावरण संरक्षण आणि हरित शहर अभियान यांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व जनकल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचा ‘काँग्रेस'चा संकल्प असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.