‘पनवेल'च्या महापौर पदी नितीन पाटील, उपमहापौर पदी प्रमिला पाटील बिनविरोध

पनवेल : पनवेल महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक १० फेब्रुवारी रोजी पार पडली. त्याअनुषंगाने पनवेल महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पीठासीन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी अर्चना योगेश भोईर यांनी महापौर पदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महापौर पदी नितीन पाटील यांची पीठासीन अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड केल्याचे जाहिर केले. तसेच लिला रतन कातकरी यांनी देखील उपमहापौर पदासाठी दाखल उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने उपमहापौर पदी प्रमिला पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच नवनिर्वाचित उपमहापौर प्रमिला पाटील यांचा महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी सर्व नवनिर्वाचित महापालिका सदस्य, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसचिव नानासाहेब कामठे यांनी केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्वीकारला पदभार