उरणमध्ये शांततेत मतदान

उरण : उरण येथील ‘रायगड जिल्हा परिषद'च्या ४ जागांसाठी १४ उमेदवार उभे आहेत. तर ‘उरण पंचायत समिती'च्या ८ जागांसाठी २३ उमेदवार उभे असून ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उरण तालुक्यातील नवघर जिल्हा परिषदच्या पाणजे मतदान केंद्रावर मतपेटीमध्ये आवाज येत नसल्याने थोडावेळ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

उरण तालुक्यातील एकूण १३५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली असून निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आविशकुमार सोनोने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी जातीने लक्ष घालून आहेत. त्यामुळे किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळले तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर ,जासई, नवघर,चाणजे या ‘जिल्हा परिषद'च्या चारही मतदारसंघात सायंकाळी ४.३० पर्यंत ६५ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे. उरण तालुक्यातील चारही ‘जिल्हा परिषद'च्या मतदारसंघात भाजप विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.त्यामुळे ‘भाजपा'चे आमदार महेश बालदी,माजी आमदार मनोहर भोईर, ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, ‘काँग्रेस'चे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, भाजपा तालुकाध्यक्ष धनेश गावंड, शेकाप तालुका चिटणीस रवी घरत, ‘मनसे'चे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान, आदि पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी बोकडविरा येथील मतमोजणी केंद्रावर सकाळी ९.३० मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

गरजेपोटीच्या घरांची शास्ती रद्द करा - ना. गणेश नाईक