पलेमिंगो लेक वाचवण्यासाठी हरित गटांची मूक मानवी साखळी

नवी मुंबई : ‘पलेमिंगो सिटी'मध्ये हरित गटांनी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन साजरा केला. यावेळी पलेमिंगो घरे- पाणथळ जागांंमध्ये वावरु नका, असा संदेश देत मूक मानवी साखळी बनविण्यात आली. ‘सेव्ह डीपीएस फ्लेमिंगो लेक 'ची घोषणा करणारे मोठे बॅनर आणि फलक हातात घेऊन, मूक आंदोलकांनी पक्षी पाहुण्यांसाठी त्यांचा एकजुटीने आवाज उठवला, जे हिवाळ्यात-उन्हाळ्यात मुंबई प्रदेशाला आपले घर बनवतात. यावेळी निसर्गाच्या सौंदर्याला मारुन टाकू नका, पलेमिंगो शहराशिवाय पलेमिंगो शहर?, पाणथळ जागा पडीक जमिनी नाहीत; पंख असलेल्या चमत्कारांना संरक्षण आवश्यक आहे, पलेमिंगोसाठी उंच उभे राहाः त्यांच्या अभयारण्याचे रक्षण करा, असे संदेश देणारे फलक पर्यावरणवाद्यांनी हाती घेतले होते. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करुन समुद्रातील भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्याने कोरडा पडून ३० एकरचा डीपीएस पलेमिंगो तलाव धोक्यात आला आहे. नेरुळ जेट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवासी जलवाहतूक टर्मिनलच्या बांधकामामुळे तलावाच्या दक्षिणेकडील मुख्य वाहिनी गाडली गेली, अशी बाब ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिली. एका महिन्यात डीपीएस तलावात उतरलेल्या पलेमिंगोपैकी १० हून अधिक पलेमिंगो मरण पावले तर पाच जखमी झाले, असे बी. एन. कुमार यांनी सांगितले. 

दरम्यान, ‘सिडको'चे अधिकारी इतके निर्दयी आणि बेजबाबदार कसे असू शकतात, याबद्दल वाईट वाटते. लोक रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत अधिकारी बेफिकीर असल्याचे दिसून येते. ती चुकीची वृत्ती आहे आणि भरमसाट पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी जबाबदार धरले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘पारसिक ग्रीन्स'चे विष्णू जोशी आणि बलापूर मधील हेमंत काटकर यांनी व्यवत केली आहे.

या सर्व प्रकारांमुळे आम्ही विविध स्तरांवर आवाज उठवत आहोत. सरकारने जबाबदारी निश्चित करण्याची आणि डीपीएस तलाव पुनर्संचयित करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘नॅटकनेवट'च्या तक्रारीला प्रतिसाद दिला असून डीपीएस तलावातील पाणी अडवण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. परंतु, अद्याप प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. - बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झालेले असून या प्रकरणी आम्ही वकिलांशी सल्लामसलत करत आहोत. - संदीप सरीन, नवी मुंबई एनव्हायर्नमेट प्रिझर्वेशन सोसायटी.

नवी मुंबई महापालिका, सिडको आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा आढावा घेण्यासाठी डीपीएस तलावाला भेट दिल्यास तलावातील पाण्याचा प्रवाह पूर्ववत होईल. परंतु, या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनीही आम्हाला येथे पलेमिंगो येताना दिसत नाहीत, ते पाहून आम्ही पूर्णपणे निराश झालो आहोत. - अंजली अग्रवाल, सेव्ह पलेमिंगोज ॲन्ड मॅन्ग्रोव्हज फोरम. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चिरनेर गावातील मातीच्या भांड्यांना वाढती मागणी