ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नेरुळ मधील ओपन जिम, खेळणी-बेंचेसचे लोकार्पण
नवी मुंबई : ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या ओपन जिम उभारण्यात आल्या आहेत. याबद्दल नवी मुंबईकरांच्या वतीने आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांचच कौतुक होत आहे. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने अनेक उद्यानांमध्ये सुरु करण्यात आलेल्या ओपन जिमचा ताबा मुख्यत्वे करुन तेथील ज्येष्ठ नागरिक घेत असल्याचे दिसून येत आहेत. याच अनुषंगाने नेरुळ, सेवटर-१८ए मधील कै. शांताराम पोशा भोपी उद्यान येथे आमदार सौ.म्हात्रे यांच्या वतीने २० लाख रुपयांच्या निधीतून ज्येष्ठ नागरिकांकरिता ओपन जिम, लहान मुलांकरिता खेळणी आणि बेंचेस बसविण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थिती माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महापालिकेच्या उद्यानांमध्ये अथवा सार्वजनिक मोकळ्या जागांमध्ये अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार ओपन जिम सुरु झाली असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद या संकल्पनेला मिळत आहे. नवी मुंबई शहराला उद्यानाचा दर्जा मिळत असून अनेक उद्यानांतील ओपन जिम आणि खेळणी याचा पुरेपूर फायदा बच्चे कंपनी आणि ज्येष्ठ नागरिक घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिम निर्माण केली असून त्या ओपन जिमच्या माध्यमातून ज्येष्ठांना सकाळी व्यायाम करता यावे आणि त्यांना आपले आरोग्य निरोगी ठेवता येईल या दृष्टीकोनातून ओपन जिम उभारण्यात आली आहे, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली. तसेच या वर्षाचा नवीन संकल्प म्हणून बेलापूर मतदारसंघातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचासाठी मी वर्षभर काम करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी ‘भाजपा महिला मोर्चा'च्या जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, समाजसेवक धनाजी ठाकूर, शेखर भोपी, देवनाथ म्हात्रे, राजू तिकोने, प्रीती भोपी, सुहासिनी नायडू, गणपत ठाकूर, जयेश ठाकूर, साई म्हात्रे, योगेश ठाकूर तसेच ‘माऊली इंटरप्रायजेस'चे ठेकेदार प्रतिक पाटील आणि विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.