‘नमो संवाद कॉर्नर सभा' संदर्भात बैठक संपन्न
सीबीडी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छोट्या छोट्या कॉर्नर सभांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला जावा याकरिता ‘भाजपा'चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार ‘नमो संवाद कॉर्नर सभा' आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने १५१-बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी ‘नमो संवाद कॉर्नर सभा' संदर्भात रुपरेषा ठरविण्याकरिता भाजपा सुपर वारीयर्स, बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांची ११ एप्रिल रोजी बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, ‘भाजपा महिला मोर्चा'च्या जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार, माजी नगरसेविका राजश्री कातकरी, माजी नगरसेवक अशोक गुरखे, डॉ. जयाजी नाथ, गणेश म्हात्रे, सुनील पाटील, गिरीश म्हात्रे, प्रदीप गवस, दिपक पवार, दिनानाथ पाटील, दत्ता घंगाळे, समाजसेवक राजू तिकोने, समाजसेवक पांडुरंग आमले, संजय ओबेरॉय, विकास सोरटे, जयश्री चित्रे, पुण्यनाथ तांडेल तसेच भाजपा सुपर वारीयर्स, बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा सुपर वारीयर्स, बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांनी शक्तीकेंद्र स्तरावर बुथ निहाय ‘नमो संवाद कॉर्नर सभा' घेण्याच्या सूचना आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ‘महायुती'चा उमेदवार अजून ठरला नसला तरी आपण एक मताने विकासाचे महापुरुष नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्याकरिता एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘नमो संवाद कॉर्नर सभा'साठी शक्ती केंद्र स्तरावरील गर्दीची, बाजारपेठेची ठिकाणे निवडून शक्तीकेंद्रातील कला, क्रीडा, सामाजिक, सांकृतिक, शैक्षणिक, उद्योग आणि इतर क्षेत्रातील अराजकीय व्यक्तींना आमंत्रित करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य म्हणजे गरीब जनतेकरिता प्रत्येक पैसा गरीब कल्याणासाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये १० % आरक्षण सुनिश्चित केले गेले. आसाम मधील सर्वात लांब बोगीबील पुलाचे बांधकाम आणि सुबनसिरी लोअर येथे २००० मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प, आदिवासी आसाम शांतता करार आणि बोडो, नागा कार्बी शांतता कराराने ईशान्येत शांतता प्रस्थापित केली. अयोध्या मधील श्री रामजन्मभूमी मंदिर आणि कशी विश्वनाथ आणि उज्जेन महाकाल मंदिरात भव्य कॉरीडॉरचे बांधकाम, सोमनाथ आणि केदारनाथ मंदिराचा जीर्णोध्दार अशा अनेक पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात झाली असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.