अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध
नवी मुंबई : ‘आम आदमी पार्टी'चे सर्वेसर्वा तथा ‘दिल्ली'चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या असंवैधानिक अटकेचा, शांतीपूर्ण निषेध करण्यासाठी ‘टीम आप'नवी मुंबई, पनवेल यांच्या वतीने ३० मार्च रोजी वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
सर्वप्रथम, ‘टीम आप'नवी मुंबई तर्फे नेते अरविंद केजरीवाल यांना समर्थन देण्यासाठी सानपाडा, सेवटर-८ मधील केमिस्ट भवन ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये टीम आप नवी मुंबई तर्फे माजी नवी मुंबई शहरअध्यक्ष श्यामभाऊ कदम, नवी मुंबई उपाध्यक्ष मिलिंद तांबे, प्रीती शिंदेकर, ऐरोली नोड महिला अध्यक्ष गायत्री तांबे, सीवुडस् नोड महिला अध्यक्ष पूर्वी मोदी, कोपरखैरणे संघटक पुरण सिंग, क्रिएटिव्ह ग्रुपचे संदीप निकम तसेच इतर पदाधिकारी-कार्यकर्ते यांचा सक्रिय सहभाग होता.
त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथे शांतीपूर्ण मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले. या शांतीपूर्ण आंदोलनासाठी ‘निवडणूक आयोग'ने निर्देश केलेल्या आचारसंहितेचा मान राखत अधिकृत परवानगी घेणव आली होती. सदर धरणे आंदोलनाचे आयोजन ‘ऑल इंडिया मानव अधिकार संस्था'तर्फे करण्यात आले होते. या आंदोलनासाठी ‘ऑल इंडिया मानव अधिकार संस्था'च्या अध्यक्षा विनिता बर्फे आणि त्यांचे पथक तसेच चिमाजी शिंदे यांच्यासह ‘आप'च्या पनवेल मधील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.