सन २०२५ मध्ये ठाण्यात मेट्रो धावणार-खा. राजन विचारे 

ठाणे : शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे वाढलेल्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रोचा मोठा दिलासा ठरणार आहे.  मेट्रो मार्ग सुरु झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करीत होते. यासाठी विधिमंडळात सहकाऱ्यांबरोबर अनेक आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर मेट्रो मार्ग क्रमांक ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गाला सन जून २०१६ रोजी १४,५४९ कोटीची मंजुरी मिळून प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाच्या कामाला एप्रिल २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आलेली असल्याचे खा. विचारे यांनी सांगितले. 

 ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांनी पुन्हा एकदा सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला आहे. त्यावेळी  पॅकेज क्रमांक 11, 12 व 4A चे अभियंता निलेश महाले, सुरेंद्र शेवाळे, भूषण मैसके, नगर अभियंता ठामपा सोनाग्रा तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मंजुशा भोंगाळे, गोरख पाटील त्याचबरोबर जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, उप शहर प्रमुख संतोष शिर्के, सदाशिव पूर्णेकर, विभाग प्रमुख प्रतिक राणे, प्रदीप पूर्णेकर, अरविंद भोईर, संजय दळवी, राम काळे, विभाग संघटक गीता चव्हाण, ज्योती कदम व इतर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार राजन विचारे यांनी कापुरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, सुरज वाटर पार्क, कासारवडवली आणि भाईंदर पाडा अशा व इतर ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. कापूरबावडी येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेला कोलशेत रोड पुन्हा सुरू करण्याची मागणी वाहतूक शाखेकडे व नगर अभियंता यांच्याकडे केली आहे. ज्या ठिकाणी मेट्रो नी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी बॅरिगेट लावून ती जागा बंद करावी जेणेकरून अपघात टळू शकतील प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच ज्या ठिकाणी सर्विस रोड डीपी मध्ये आहेत ते पूर्ण करण्याच्या सूचना नगर अभियंतांना केल्या आहेत. खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करून मेट्रो सुरू करू असे आश्वासन दिले आहे.

मेट्रो मार्ग क्रमांक ४ वडाळा ते कासारवडवली कामाची स्थिती (एकूण ६५.३२% काम पूर्ण)

 पॅकेज क्रमांक ८ - भक्ती पार्क ते अमर महल
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके - भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टी टी, अनिक नगर बस डेपो, सिद्धार्थ कॉलनी
कामाची स्थिती - ४६.५३% काम पूर्ण 

 पॅकेज क्रमांक 9- गरोडिया नगर ते सूर्या नगर
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- गरोडिया नगर, पंतनगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सुर्यानगर
कामाची स्थिती - ८७.८१ % काम पूर्ण 

 पॅकेज क्रमांक १०- गांधिनगर ते सोनापूर
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- गांधिनगर, नवल हाऊसिंग, भांडुप महापालिका, भांडुप मेट्रो, शंग्रीला, सोनापूर
कामाची स्थिती - ५४% काम पूर्ण 
 

 पॅकेज क्रमांक ११- मुलुंड ते माजिवडा

या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका स्टेशन, तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा

कामाची स्थिती – ९०.९८%काम पूर्ण 

 पॅकेज क्रमांक १२- कापूरबावडी ते कासारवडवली
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- कापूरबावडी, मानपाडा, टीकुजीनी वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली कामाची स्थिती - ५५.३८ % काम्पुर्ण 
 

 मेट्रो मार्ग क्रमांक ४A कासारवडवली ते गायमुख
भाग क्रमांक १- कासारवडवली ते गायमुख
या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- गोवनी पाडा ,गायमुख
कामाची स्थिती - ६७.३१% काम पूर्ण 
 

 मेट्रो मार्ग क्रमांक १० गायमुख ते मीरा भाईंदर

दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्ग क्र ९ व ठाणे मेट्रो ४ ए याला जोडण्यासाठी या मेट्रो मार्ग क्र १० गायमुख ते मीरा भाईंदर यालाही जोडण्यासाठी सर्वात पहिली मागणी करण्यात आली होती. या मेट्रो मार्गालाही राज्य शासनाची ०६ सप्टेंबर २०१९ रोजी ४ हजार ४७६ कोटीची मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये गायमुख रेतीबंदर, वर्सोवा चार फाटा, अमर मेहल, शिवाजी चौक काशिमिरा या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अद्याप केंद्र शासनाची परवानगी मिळालेली नाही.
मेट्रो मार्ग क्रमांक ५ कापुरबावडी, ठाणे ते भिवंडी
याचे काम प्रगतीपथावर सुरु असून ८४.१३% काम पूर्ण झाले आहे.

 

अंतर्गत मेट्रो यासाठी महापालिकेने १० हजार ४१२.६१ कोटी इतक्या रकमेचा डीपीआर तयार असून तो आपल्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. परंतु अद्याप केंद्र शासनाने मंजुरी न दिल्याने अंतर्गत मेट्रो प्रकल्प रखडला आहे.


 मेट्रो मार्ग क्रमांक १० गायमुख ते मीरा भाईंदर
दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्ग क्र ९ व ठाणे मेट्रो ४ ए याला जोडण्यासाठी या मेट्रो मार्ग क्र १० गायमुख ते मीरा भाईंदर यालाही जोडण्यासाठी सर्वात पहिली मागणी करण्यात आली होती. या मेट्रो मार्गालाही राज्य शासनाची ०६ सप्टेंबर २०१९ रोजी ४ हजार ४७६ कोटीची मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये गायमुख रेतीबंदर, वर्सोवा चार फाटा, अमर मेहल, शिवाजी चौक काशिमिरा या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अद्याप केंद्र शासनाची परवानगी मिळालेली नाही.
मेट्रो मार्ग क्रमांक ५ कापुरबावडी, ठाणे ते भिवंडी
याचे काम प्रगतीपथावर सुरु असून ८४.१३% काम पूर्ण झाले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव