महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
मतदान जागृतीसाठी रन ॲन्ड वोट
ठाणे : येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी जागृती करण्यासाठी ठाणे येथे ११ मे रोजी सकाळी ‘मिनी मॅरेथॉन'चे (रन अँड वोट-२०२४) आयोजन करण्यात होते. या ‘मिनी मॅरेथॉन'ला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ठाणे महापालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे या ‘मॅरेथॉन'चे आयोजन केले होते. ‘मिनी मॅरेथॉन'ला सकाळी ६.३० वाजता प्रारंभ झाला. ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ‘मॅरेथॉन'चा झेंडा दाखवून आरंभ केला.
तत्पूर्वी स्पर्धक, महापालिका अधिकारी-कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, तुषार पवार, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मुख्य लेखा अधिकारी दिलीप सुर्यवंशी, मिनल पालांडे, सहायक आयुक्त सचिन बोरसे, रंजू पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, ‘ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन'चे कॅसबर ऑगस्टीन, आदि उपस्थित होते. राजेंद्र पाटणकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी धावपटुंचे मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले. तसेच मतदान करण्याचा संदेश घरोघरी घेऊन जाण्याचे आवाहनही केले.
तर मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते आपण न चुकता सजगपणे पार पाडले पाहिजे. तसेच आपण तर मतदान करावेच शिवाय इतरांनाही मतदानाचे स्मरण करुन द्यावे, असे आवाहन यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.
महापालिका अधिकारी-कर्मचारी यांचीही विशेष दौड यावेळी झाली. ‘मिनी मॅरेथॉन'मधील सर्व विजयी स्पर्धकांना डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या समारंभात पारितोषिके प्रदान करण्यात आली.
‘मिनी मॅरेथॉन' विजेतेः
५ कि.मी. १८ वर्षांवरील पुरुष गटः अनिल कोरवी, रोशन रहाते, नीरज निषाद.
महिला गटः अदिती पाटील, खुशबू बघेल, ज्योती सिंग.
३ कि.मी. १५ ते १८ वयोगट मुलेः दुर्वेश पाटील, जन्मजय गौड, चंदन शर्मा.
मुलीः गायत्री शिंदे, रोहिणी खरिवले, कल्पना कुशवाह.
२ कि.मी. १२ ते १५ वयोगटः स्वराज गावकर, शंभूराज शिंदे, अंकित पटेल.
मुलीः बुशरा शेख, भक्ती कदम, तन्वी महापदी.