वाशी मध्ये संविधान, संसद भवनाची प्रतिकृती

वाशी : महामानव संयुक्त जयंती महोत्सव समिती तर्फे भारतीय राज्घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वाशी मध्ये दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने समिती तर्फे वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संविधान आणि संसद भवनाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. संविधान आणि संसद भवनाची प्रतिकृती पाहण्यासाठी नवी मुंबईतील नागरिकांनी गर्दी केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आणि संसद भवनातून या संविधानाची होणारी अंमलबजावणी याची जाणीव तरुण पिढीला व्हावी, यासाठी समिती द्वारे संविधान आणि संसद भवनाची प्रतिकृती उभारण्यात आली, असे ‘समिती'चे सचिव विनोद इंगळे यांनी  सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

करावे गावातील गावदेवी माता जत्रोत्सव मध्ये भाविकांची मांदियाळी