ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
प्रजासत्ताक दिन निमित्त खारघर मध्ये आकर्षक विद्युत रोषणाई
खारघर : ७५व्या भारतीय प्रजासत्ताक दिन निमित्त पनवेल महापालिका तर्फे खारघर मध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिन तसेच महापालिका द्वारे सुरु असलेल्या स्वच्छता अभियान अंतर्गत खारघर मधील हिरानंदानी चौक, कोपरा ब्रिज, उत्सव चौक, शिल्प चौक, महावीर हेरिटेज समोरील आय लव्ह यु सर्कल, सेंट्रल पार्क समोरील चौक आदी परिसर आकर्षक रोषणाईमुळे झगमगत्या दिव्यांनी उजळून निघाला आहे. हिरानंदानीकडून उत्सव चौककडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झाडांवरही रंगीबेरंगी आकाश कंदील लावण्यात आले आहेत. आकर्षक विद्युत रोषणाईमुळ उत्सव चौक परिसरातील लखलखते सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडत आहे.
दरम्यान, देशाचा ७५वा प्रजासत्ताक दिन तसेच पनवेल महापालिका तर्फे स्वच्छता अभियान सुरु आहे. त्यामुळे खारघर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, असे महापालिका खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी सांगितले.