ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
श्रीमूर्ती विसर्जनाकडे महापालिका प्रशासनाची पाठ?
वाशी : भाद्रपद महिन्यातील श्रीगणेशोत्सव प्रमाणे माघी श्रीगणेश जयंती उत्सव देखील नवी मुंबई शहरात मोठ्या भवतीभावाने साजरा केला जातो. नवी मुंबई शहरातील बहुतांश घरात श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करुन भक्तिभावात माघी श्रीगणेश जयंती साजरी करण्यात आली. मात्र, या उत्सवात नवी मुंबई शहरातील तलावांवर मागणी करुन देखील सोयी सुविधा पुरवण्याकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने पाठ फिरवल्याने श्रीभक्तांनी नाराजी व्यक्त केली.
भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीप्रमाणे आता माघी श्रीगणेश जयंती साजरी करण्याकडे भक्तांचा कल वाढला आहे. त्यामुळे श्रीगणेश मूर्ती विसर्जन करीता तलाव ठिकाणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, अनिकेत म्हात्रे यांनी मागणी करुन देखील नवी मुंबईतील तलावांवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी महापालिका तर्फे कुठलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. तर श्रीमूर्ती विसर्जनवेळी तलावांवर पोलिसांचे दर्शन देखील दुर्लभ झाले होते. त्यामुळे श्रीमूर्ती विसर्जन करीता श्रीमूर्ती घेऊन आलेल्या भक्तांची मोठी गैरसोय झाली. मात्र, नवी मुंबई मधील गावठाण भागातील तलावांवर स्थानिक स्वयसेवकांनी दिलेल्या योगदानामुळे ‘श्रीमूर्तीं'चे व्यवस्थित विसर्जन करता आले.