कळवा परिसरात ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम' संपन्न

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत १०फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या ‘सर्वंकष स्वच्छता अभियान'ला स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सदर मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनिष जोशी, अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे तसेच महापालिका अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.

सकाळी ६ वाजता कळवा नाका येथून ‘अभियान'ला सुुरुवात करण्यात आली. कळवा परिसरातील मुख्य रस्ते झाडून तद्‌नंतर पाण्याने स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावरील दुभाजक स्क्रबरच्या सहाय्याने घासून नंतर पाण्याच्या फवारणीने स्वच्छ धुण्यात आले. परिसरातील रस्त्यांंबरोबरच शहरातील उद्याने आणि मोठे नाले देखील स्वच्छ करण्यात येत आहेत. नाल्यातील गाळ काढला जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.

कळवा परिसरातील ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम'मध्ये कळवा नाका परिसर, बेलापूर रोड , कळवा सर्कल, नक्षत्र गार्डन घाट, मनिषा नगर परिसर, मनिषा नगर स्मशानभूमी, शास्त्रीनगर सत्संग भवन, कळवा प्रभाग समिती कार्यालगत घड्याळ चौक, कळवा स्टेशन पूर्व चिंधी नाला, सह्याद्री शाळा परिसर, खारेगाव नाका सर्कल, पारसिक नगर रघुकुल परिसर, बाळाराम पाटील चौक आणि परिसर, रेतीबंदर विसर्जन घाट, बेलापूर रोड गणपती पाडा, बेलापूर रोड, सुर्या नगर, पऱ्याचे मैदान विसर्जन घाट, विटावा कोळीवाडा, भोलानगर, वाघोबा नगर, कळवा नाका सर्कल, स्व. आनंद उड्डाणपुल परिसर, आतकोनेश्वरनगर आणि परिसर, पौंडपाडा, इंदिरानगर, कळवा न्यू मार्केट, आदि परिसरातील स्वच्छता करण्यात आली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पामबीच मार्गावर सॅन्ट्रो झेन कार जळुन खाक