नेरुळ मधील ७ अनधिकृत पब/बार विरुध्द कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका अतिक्रमण विभाग आणि नेरुळ पोलीस ठाणे यांच्या संयुवत विद्यमाने नेरुळ मधील ७ अनधिकृत पब/बार विरुध्द कारवाई करण्यात आली.
३१ मे २०२४ रोजी रात्री शिरवणे, नेरुळ विभागातील राजमहाल बार, मिनिमहल बार, डायमंड बार, क्रेझी बार, लैला बार, स्टार गोल्ड आणि साई पूजा बार या एकूण ७ अनधिकृत पब/बार बाधकामाविरुध्द नेरुळ पोलीस ठाणे आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
महापालिका सहाय्यक आयुक्त तथा नेरुळ विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांनी नेरुळ विभागातील अतिक्रमण अधिकारी-कर्मचारी, अतिक्रमण मुख्यालय पोलीस पथकातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सहाय्याने ७ अनधिकृत पब/बार विरुध्द कारवाई केली.
दरम्यान, नवी मुंबई शहरातील अनधिकृत पब/बार विरुध्द यापुढेही महापालिका द्वारे कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.