भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात कायदेविषयक व्याख्यानमाला

पनवेल : थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंत्तीनिमीत्त ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था' संचालित खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात ‘जनार्दन भगत स्मृती व्याख्यानमाला' आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यान मालिकेला ‘संस्था'चे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ३१ जानेवारी रोजी सदिच्छा भेट देत मार्गदर्शन केले.

स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंती निमित्त ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'च्या भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालय मध्ये क्रिमिनल जस्टीस या विषयांवर जनार्दन भगत स्मृती व्याख्यान मालिका २७ जानेवारी पासून सुरु झाली असून, या मालिकाची सांगता येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

व्याख्यानमाला मध्ये २७ जानेवारी रोजी ‘क्रिमीनल जस्टीस सीस्टम' या विषयावर ॲड. दिलीप शिंदे यांनी, २९ जानेवारी रोजी ॲड. गजानन चव्हाण यांनी बेल ॲप्लीकेशन या विषयावर, ३० जानेवारी रोजी जस्टीस प्रदीप देशमुख यांनी ‘गुन्हेगारी पुराव्याचे मुल्यांकन' या विषयावर तर ३१ जानेवारी रोजी ‘विक्टीमोलॅजी' या विषयावर ‘डॉ. डी. वाय. पाटील स्कूल'च्या डायरेक्टर डॉ. करुणा मालवीया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानमाला मध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागातील विधी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

यावेळी ‘‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'चे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉक्टर एस. टी. गडदे, भागुबाई चांगू ठाकूर विधी कॉलेज'च्या प्राचार्य सानवी देशमुख, प्राध्यापिका अपराजिता गुप्ता, समृध्द टीवांटने, राजदीपा मढवी यांच्यासह शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘पनवेल'मध्ये ‘माझी शाळा सुंदर शाळा अभियान'ला सुरुवात