मतदारांनी मतदानाचा हवक बजावण्यासाठी डोंबिवली मध्ये ‘स्वाक्षरी मोहीम'

कल्याण : मतदारांनी मतदानाचा हवक बजावण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा' या घोषवावय अंतर्गत २४-कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ मध्ये ‘स्वाक्षरी मोहीम' राबविण्यात आली.


स्वाक्षरी मोहीम'च्या बॅनरवर ‘२० मे २०२४ रोजी मी मतदानाचा हवक बजावणार आहे', असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. या ‘स्वाक्षरी मोहीम'ला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
दरम्यान, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (निवडणूक-२०२४) पार्श्वभुमीवर ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी डोंबिवली मधील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील २४-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य कार्यालयास भेट देवून विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अधिकारी -कर्मचारी वर्गाशी नुकताच संवाद साधत उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणुकीशी निगडीत प्रश्न विचारत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी लोकसभा निवडणुकीशी निगडीत विविध विषयांचा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आढावा घेतला.


क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या दिवसापूर्वी (मतदानापूर्वी) संबंधित ठिकाणी पुरेसे फर्निचर, लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प इत्यादी सुविधा व्यवस्थित आहेत की नाही, याची खातरजमा करावी, अशीही सुचना ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी केली. तसेच अधिकारी वर्गाचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करुन निवडणूक कर्तव्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि पूर्ण ठणे जिल्हा प्रशासन आपल्या सोबत राहील, अशा शब्दात यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सर्व उपस्थित अधिकारी वर्गास आश्वस्त केले.

याप्रसंगी ‘२४-कल्याण लोकसभा मतदारसंघ'च्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते, ‘१४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ'चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी मंगेश चितळे आदी उपस्थित होते.

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 एपीएमसी बाजारातील फळ आवक मध्ये वाढ