धरणाच्या भिंतीवरुन धबधब्यासारख्या फेसाळणाऱ्या पाण्याचा पर्यटकांनी लुटला आनंद

 मोरबे धरणावर पर्यटकांची गर्दी

नवीन पनवेल : धो धो पाऊस बरसात असल्याने १६ जुलै रोजी पनवेल तालुक्यातील मोरबे धरणावर पर्यटकांनी धमाल उडवली होती. मोरबे धरणाच्या भिंतीवरुन धबधब्यासारख्या फेसाळणाऱ्या पाण्याचा शेकडो पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला.

पावसाळा सुरु झालेला असल्याने पर्यटकांच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही. पनवेल तालुक्यातील गाढेश्वर आणि मोरबे धरण देखील पर्यटकांना खुणावू लागले आहेत. निसर्गरम्य ठिकाण, हिरवीगार वनराई आणि भिरभिरणारा वारा या थंड वातावरणात धबधब्याखाली चिंब भिजण्याची मजा काही औरच म्हणावी लागेल. पनवेलपासून २० कि.मी.अंतरावर असलेल्या मोरबे धरणाकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे. निसर्गाचे सानिध्य, हिरवाई, चारही बाजुने डोंगराच्या रांगा यामुळे पर्यटक धरणाकडे अधिक आकर्षक होतात. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जुन येतात. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या वारी हजाराेंच्या संख्येने पर्यटक मोरबे धरणात मौजमजा करण्यासाठी येतात. १६ जुलै रोजी धो धो पाऊस बरसात असल्याने मोरबे धरणावर पर्यटकांनी धमाल उडवली होती. यावेळी मोरबे धरणाच्या भिंतीवरुन धबधब्यासारखे फेसाळणाऱ्या पाण्याचा शेकडो पर्यटकानी मनसोक्त आनंद लुटला.

मोरबे धरणात पर्यटक मौजमजा करण्यासाठी उतरत असल्यामुळे या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. धरणातील पाण्यात उतरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. पोलिसांच्या बंदीमुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. मात्र, तरी देखील काही पर्यटक येथे मौजमजा करण्यासाठी येतात. १६ जुलै रोजी अनेक पर्यटकांनी धरणावर बांधलेल्या बंधाऱ्यावरुन आदिवासी बांधव ये-जा करत असतात, त्या बंधाऱ्यावरुन मार्गक्रमण केले. पर्यटक अशा प्रकारे आडवाटेने धरणाकडे येत असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील दुकानाचा सज्जा जमीनदोस्त