कोपरखैरणे येथे दि.बा.मोकाशी यांच्या कथेचा नाट्यरुपी कलाविष्कार सादर

नवी मुंबई : मराठी साहित्यात, नाटकात अभिनवता, प्रायोगिकता यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याकरिता अन्वय प्रतिष्ठान, स्त्री मुक्ती संघटना आणि प्रभात नेत्र चिकित्सालय यांच्या वतीने अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांच्या ‘आता आमोद सुनासी आले' या दि.बा.मोकाशी यांच्या कथेचा दास्तानगोई या रूपात कलाविष्कार ९ मे रोजी कोपरखैरणे येथील स्त्री मुवती संघटनेच्या सभागृहात सादर करण्यात आला. जन्म मृत्यू या अटळ आणि एक अविरत असं जीवनाचं अंग आहे. रामजीच्या मुलाचं जाणं आणि गाईच्या उदरातून पाडस जन्माला येणं या प्रकृतीच्या सामान्य जीवन सातत्यावर तात्वज्ञानिक भाष्य करणारा हा एक अनोखा नाट्यविष्कार रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. टाळ आणि अभंगाच्या सुंदर मिश्रणामुळे दास्तानगोई हा फॉर्म परका न वाटता अगदी मराठमोळा वाटल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांतून उमटली.

प्रायोगिकतेला उत्तेजन देण्यासाठी आयोजित केलेल्या या प्रयोगामुळे समाधान वाटल्याचे डॉ.अजित मगदूम यांनी प्रस्तावनेत सांगितलं. या प्रयोगानंतर जाणकार रसिकांच्या, चित्र-नाट्य कलावंतांच्या प्रतिक्रिया, प्रतिसादाला धरुन अक्षय आणि नेहा यांनी चर्चा घडवून आणली. याप्रसंगी डॉ प्रशांत थोरात, ज्योती म्हापसेकर, वृषाली मगदूम, सुभाष कुलकर्णी लोकसेवा आयोगाचे सदस्य दिलीप पांढरपट्टे, अभिनेते अशोक पालवे, सावित्री मेधातुल, कवी जितेंद्र लाड, गजानन म्हात्रे, निवेदिका डॉ मृण्मयी भजक, अनिल लाड, दिघा येथील विविध नाट्यप्रेमी विद्यार्थी आणि स्त्री मुक्ती संघटनेच्या अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. वृषाली मगदूम यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पलेमिंगो लेक वाचवण्यासाठी हरित गटांची मूक मानवी साखळी