मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
उरण - न्हावा शेवा वाहतूक पोलीसांनी विद्यार्थ्यांना दिले वाहतूकीच्या नियमांचे धडे
वाहतूक पोलीसांनी विद्यार्थ्यांना दिले वाहतूकीच्या नियमांचे धडे
उरण : न्हावा शेवा वाहतूक शाखे तर्फे 'रस्ता सुरक्षा अभियान' अंतर्गत मोरु नारायण म्हात्रे विद्यालय , खारकोपर, उलवे येथे 'रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम ' या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी दिनांक २ फेब्रुवारी करण्यात आले होते.यावेळी छोटा पोलीस मास्करेड चा वापर करून वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली आहे.
बेशिस्त वाहन चालक, वाढते अपघात या वर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीमुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त श्री.तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व न्हावा शेवा पोलीस वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी एम मुजावर, पोलीस शिपाई मयूर पाटील व मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे प्राचार्य ,शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला होता.यावेळी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक शाखा व विद्यालया कडून सन्मानित करण्यात आले.