मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया अंतर ९ तास ३६ मिनिटांत केले पार
नवी मुंबई : कोपरखैरणे गावाचा भुमिपुत्र व रामशेठ ठाकूर विद्यालयातून पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या तन्मय महेंद्र सुतार याने २९ फेब्रुवारी रोजी धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी अंतर ९तास ६ मिनिटात कापले. पहाटे २ वाजून ३० मिनिटांनी धरमतर खाडीत रात्रीच्या अंधारात सूर मारत सकाळी ११वाजून २६ मिनिटांनी तो गेट वे ऑफ इंडिया येथे पोहचला.
तन्मय सुतार याने यापूर्वी एका महिन्यात ५ सागरी खाड्या पोहून जाण्याचा विक्रमाची नोंद केली असून त्याची दखल नवी मुंबई भूषण पुरस्कार देऊन घेण्यात आली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड (ग्रँडमास्टर ) यातही त्याचे नाव झळकले आहे. नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनने पोहण्याचा सराव करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ दिलिप राणे, लायन विजय पाटील व नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन येथील कोच संकेत सावंत, उरण येथील सागरी कोच संतोष पाटील, नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनचे सूर्यवंशी सर, फिटनेस कोच जमील सर यांचे आभार व्यक्त करतानाच आई वडील सौं रेखा व महेंद्र सुतार यांनी दिलेले पाठबळ मोलाचे असल्याचे तन्मय याने नमूद केले.