ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा ‘काँग्रेस'चा घाट

कल्याण: पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या काळापासून २०१४ पर्यंत ‘काँग्रेस'कडून अफुची गोळी घेत गरीब..गरीब... अशी माळ जपली जात असून, गरीबांचा खेळ केला गेला. तर आता ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासी यांच्या आरक्षणाची लूट करण्याचा ‘बेलापूर'चा डाव आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण येथे केला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या शहजादेंविरोधात नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तोंडाला कुलूप आणि डोळ्यावर पट्टी बांधली आहे, अशी टीकाही मोदी यांनी केली.

‘महायुती'चे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण मधील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम मधील व्हर्टेक्स छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १५ मे रोजी विराट सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. सदर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस'चे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ‘भाजपा'चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उमेदवार ना. कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, ‘मनसे'चे आमदार राजू पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रकाश भोईर, सुलभा गायकवाड, आदिंह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कल्याण मधील दुर्गादेवी, तिसाई आणि अंबरनाथ मधील महादेवाला प्रणाम करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. ‘इंडिया आघाडी'कडून हिंदू-मुस्लिम असा खेळ केला जात आहे. मोदींकडून हिंदू-मुस्लिम वाद केला जात असल्याचा आरोप केला जातो. पण, मोदी सदर खेळ खेळणाऱ्यांचा ‘कच्चा चि्ीा खोल रहा है,' असे बोलत नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेस'ला आव्हान दिले. आई-वडिलांची आठवण काढण्यासाठीही ‘काँग्रेस'वाले अल्बम उघडून पाहतात, अशी ‘काँग्रेस'ची स्थिती आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारला.

ओबीसी, दलित आणि आदिवासींचे आरक्षण कमी करुन मुस्लिमांना देण्यासाठी ‘काँग्रेस'ने कर्नाटक प्रयोगशाळा केली आहे. कर्नाटकात सत्ता मिळाल्यावर एका रात्रीत ओबींसीचे आरक्षण मुस्लिमांना दिले गेले. देशात अशाच पध्दतीने मुस्लिमांना आरक्षण दिले जाण्याचा डाव आहे. ‘वोट जिहाद' घडविले जात आहे. मात्र, त्याचा महाराष्ट्रातील ‘इंडिया आघाडी'च्या एकाही नेत्याने विरोध केला नाही, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले. अशा ‘काँग्रेस'ला महाराष्ट्रातील जनता मत देईल का, असा सवालही त्यांनी केला.

‘काँग्रेस'कडून दहशतवादाचे समर्थन केले जात असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांगणारेही ‘काँग्रेस'चा कुर्ता धरुन उभे आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना-ठाकरे गटावर केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या महानतेबाबत शहजादेंना पाच वाक्य बोलण्यास सांगावे, असे आव्हानही नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर विकसित भारत घडविण्यासाठी पहिल्या १०० दिवसांत ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार आहे. त्यात देशातील युवकांचा सहभाग असावा, यासाठी आणखी २५ दिवसांचा कालावधी वाढवून युवकांना नाविन्यपूर्ण कल्पना पाठविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

विकसित भारत घडविण्यासाठी आणि ‘इंडिया आघाडी'च्या तुष्टीकरणाविरोधात भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील आणिकल्याण मधून डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयी करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या अखेरीस केले.

तत्पूवार्ी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात शिवसेना-उध्दव ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई बॉम्बस्फोट मधील आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीच्या प्रचारात उतरविले जाऊन, पाकिस्तानच्या घोषणा दिल्या गेल्या. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने विकासाचा माहौल तयार झाला असल्याचे सांगून ‘महायुती'चा विजय होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

इमारतींवर असणाऱ्या विनापरवानगी, बेकायदेशीर टॉवरवर कारवाई करण्याची  मागणी