बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या ७५ झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई पनवेल महापालिकेने केली आहे. या कारवाईमुळे बेलपाडा गावातील नागरिकांना मोठा दिलासा आहे.

बेलपाडा गावाजवळ डोंगर परिसरात अनधिकृतरित्या झोपड्या बांधल्या जात असल्याची तक्रार खारघर शहर भाजपा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रवीण पाटील, ॲड. अमर उपाध्याय, कीर्ती नवघरे यांनी माजी पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती. बेलपाडा गाव मागील डोंगराळ भागात बेकायदा उभ्या राहिलेल्या झोपड्या सहजा नजरेत येत नाहीत. मात्र, डोंगरावरील  भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्यांचे बस्तान बांधल्याने नागरिकांना नाहक त्रास होत होता. त्यामुळे बेकायदा झोपड्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी अनधिकृत झोपड्यांवर वेळेवर कारवाईची गरज लक्षात घ्ोऊन माजी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रभारी महापालिका आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याकडे या संदर्भात तक्रार करुन कारवाईची मागणी केली होती. परेश ठावूÀर यांच्या मागणीची दखल घ्ोऊन १५ एप्रिल रोजी सकाळी महापालिका प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त मारुती गायकवाड, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, अतिक्रमण विरोधी प्रमुख रत्नाकर जाधव, स्वच्छता निरीक्षक संदीप भोईर, अतुल मोहोकर आणि ५० कर्मचारी यांनी तीन जेसीबीच्या सहाय्याने सदर अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करत झोपड्या बांधण्यात आलेली जागा पूर्ववत करुन नागरिकांना दिलासा दिला आहे.

या कारवाईबद्दल माजी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी समाधान व्यक्त करून प्रभारी महापालिका आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांचे दूरध्वनीवरुन आभार मानले आहेत.

दरम्यान, बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई महापालिव्ोÀने व्ोÀल्याने अनधिकृतपणे झोपड्यांचा विळखा उभारणाऱ्यांना जरब बसली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ढिसाळ नियोजनामुळे ‘सॅटीस'च्या कामाला कासवगती