किक बाँक्सिंग स्पर्धेत ओम पाटीलचे यश
उरण : किक बॉक्सिंग हा एक लढाऊ खेळ आहे, जो केवळ हाताने खेळला जातो.या खेळातून आपल्या मनावरील ताणतणाव दूर होऊन स्मरणशक्ती वाढते आणि झोप चांगली लागते.अशा किक बाँक्सिंग खेळात श्रीमती भागूबाई चागू ठाकूर द्रोणागिरी नोड या विद्यालयात इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या ओम पाटील या युवकाने तालुका, जिल्हा, आणि पुणे येथील राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवून आपल्या विद्यालयाचे, आईवडील आणि पागोटे गावाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले अशा ओम पाटील या युवकाचा आदर्श विद्यार्थीनी अंगीकारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे जेष्ठ नेते वाय टी देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
पागोटे गावचे माजी सरपंच योगेश पाटील आणि माजी सरपंच पूनम योगेश पाटील या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या ओम या तरुणाला लहानपणापासून अभ्यासाबरोबरच, किक बाँक्सिंग या खेळांची आवड आहे.त्यांनी किक बाँक्सिंग स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि पुणे येथील राज्यस्तरावर घवघवीत यश मिळविले आहे.तसेच आँलम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊन देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचा त्याचा मानस आहे.ओम पाटील यांच्या या यशाबद्दल श्रीमती भागूबाई चागू ठाकूर विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओम पाटील व त्यांचे आई वडील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते वाया टी देशमुख, अमोघ प्रशांत ठाकूर, शिक्षणमहर्षी प्राचार्य एस टी गडडे, जनार्दन कासार,विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत घरत, प्राचार्या अनुराधा काठे, सुनील पाटील, शेखर तांडेल, सुरेश पाटील सह इतर मान्यवर उपस्थित होते.ओम पाटील यांच्या या यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी,परेश ठाकूर,अरुण ठाकूर,माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, रविंद्र पाटील, उज्वला पाटील यांनी ही कौतुक केले आहे.ओम चे प्रशिक्षक म्हणून दिपक घरत,शुभम म्हात्रे आणि राम चव्हाण काम पाहत आहेत.