नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी : आयुक्त गणेश देशमुख

रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात

पनवेल : आयुष्मान भारत डिजिटल मिशन'चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी आभा कार्डसाठी नोंदणी करावी असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. या कार्डवरती रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले , उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. माहिती डिजिटल स्वरूपात असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार इत्यादी माहिती समजण्यास जलद आणि सोयीस्कर मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

आभा हेल्थ कार्डचे फायदे
■ उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज लागणार नाही.
■ आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार, याची संपूर्ण माहिती असेल.
■ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.
■ ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई- फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील..
■ वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल.

आभा आरोग्य कार्ड कसे काढावे ?
■ नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in वर जावे.
■ होम पेजवर क्रिएट आभा नंबर असे बटन असेल, त्यावर क्लिक करावे.
■ पुढच्या पेजवर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील
■ आधार कार्ड आणि वाहतूक परवान्याचा वापर करून हेल्थ कार्ड तयार करता येते.

आभा कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
■ आधार कार्ड
■ आधार लिंक मोबाइल क्रमांक
■ आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर वाहतूक परवान्याचा पर्याय निवडावा.

 दरम्यान नागरिकांना जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आभा कार्ड विषयी सहकार्य करण्यात येत आहे. नागरिकांनी नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अशी माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रायगड जिल्हा सेवा दल काँग्रेस कमिटीची आढावा बैठक उत्साहात संपन्न