इमारतींवर असणाऱ्या विनापरवानगी, बेकायदेशीर टॉवरवर कारवाई करण्याची  मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील इमारतींवर असणाऱ्या विनापरवानगी बेकायदेशीर टॉवरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात दिघा ते बेलापुर दरम्यान इमारतींवर, शॉपिंग कॉम्पलेक्स व अन्य वाणिज्य संकुलांवर आपणास मोठ्या प्रमाणावर मोबाईल टॉवर लागलेले आहे. या सर्वांची पाहणी व मोजणी करून त्यातील किती अधिकृत व किती अनधिकृत आहेत, याची शहनिशा करण्यात येतील. यातील अनेक मोबाईल टॉवर निश्चितच विनापरवानगी, अनधिकृतरित्या लागलेले असणार, याची आम्हाला खात्री आहे. विनापरवानगी बेकायदेशीररित्या असणाऱ्या मोबाईल टॉवरवर कारवाई करुन ते तात्काळ काढण्यात यावेत  व संबंधितांवर महापालिका प्रशासनातर्फे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. या विनापरवानगी लावण्यता आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरमुळे महापालिका प्रशासनाचा आजवर लाखो रुपयांचा महसूल बुडालेला आहे, तोही यनिमित्ताने  वसुल करण्यात यावा. मोबाईल टॉवर असणाऱ्या इमारतींचे  तातडींने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास संबंधित गृहनिर्माण  सोसायटी, शॉपिंग कॉम्पलेक्स व अन्य वाणिज्य संकुलांना द्यावेत. मोबाईल टॉवर सांभाळण्याइतपत संबंधित वास्तूची क्षमता आहे का, याचीही खातरजमा करणे आवश्यक आहे. अन्यथा वादळी वाऱ्यात मोबाईल टॉवर पडल्यास इमारतीचे नुकसान तसेच इमारतीखाली असणाऱ्या जिवितहानीचे नुकसान होण्याची भीती आहे. 

त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने शहरातील मोबाईल टॉवर तपासणीचे आदेश देवून अनधिकृतरित्या विनापरवानगी लागलेल्या टॉवरवर कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जाहीरनाम्यातील ‘संकल्पपत्र' जाहीर