महापालिकेच्या विविध आठ वाहनांचा लोकार्पण सोहळा

पनवेल : महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या विविध आठ वाहनांचा आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी राहूल मुंडके, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड , उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, तहसीलदार विजय पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, नगर रचना संचालक ज्योती कवाडे, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी,मुख्य अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, उपमुख्य लेखा परीक्षक संदिप खुरपे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात लोकार्पण सोहळा  करण्यात आला.

यामध्ये उद्यान विभागासाठी  लागणारे रस्त्यांच्या डिव्हाइरमधील झाडांना पाणी घालण्यासाठी चार पाण्याचे टॅंकर, स्ट्रीट लाईटच्यामध्ये येणाऱ्या झाडांच्या फांद्या तसेच इतर अडथळे दूर करण्यासाठी विद्युत विभागासाठी एक स्काय लिफ्ट वाहन व पावसाळ्यापूर्वीच्या वृक्ष छाटणीसाठी वृक्ष प्राधिकरण विभागासाठी एक स्काय लिफ्ट वाहन यांचा लोकार्पण सोहळा  करण्यात आला.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे महापालिका तर्फे प्रजासत्ताक मोठ्या उत्साहात साजरा