मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
रस्त्यावरील वाहतुकीला सांडणाऱ्या ऑईलचे शुवलकाष्ट
सन २०२३ वर्षात रस्त्यावर ऑइल सांडण्याच्या २०४ घटना
ठाणे : ठाणे शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. ठाणे मुंबई लगतचे शहर आहे. त्यातच ठाणे महापालिका हद्दीतून अनेक राज्य मार्ग जातात. या महामार्गावर अनेक मोठे ट्रक, डंपर, क्रेन, कंटेनर, चारचाकी वाहने, दुचाकी सारख्या वाहनांची सतत वाहतूक सुरु असते. त्यामुळेच शहरात महामार्गावर वाहतूक कोंडी आणि वाहनातून रस्त्यावर पडणारे ऑईल तसेच झालेल्या अपघातातून वाहनातील ऑईल सांडण्यासारख्या घटना घडत राहतात. यानंतर घटनास्थळी पोहोचून ‘महापालिका आपत्ती व्यवस्थापन'चे पथक माती टाकून वाहनांना मार्ग मोकळा करुन देतात. परिणामी, यामध्ये ‘महापालिका आपत्ती व्यवस्थापन'ला मोठी कसरत करावी लागत असल्यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
ठाणे हद्दीत आग लागल्यास, रस्त्यावर ऑईल सांडल्यास, अपघातात रस्त्याच्या मध्ये असलेली वाहने बाजुला करणे अशी विविध पध्दतीची कामे ‘ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग'कडे आहेत. त्यामुळे ‘आपत्ती व्यवस्थापन'ला कॉल मिळताच पथक घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करीत असतात.
ठाणे महापालिका हद्दीतील महामार्गावर रस्त्यावर अज्ञात वाहनातून ऑइल पडण्याच्या आणि अपघातानंतर रस्त्यावर ऑइल सांडून वाहतुकीचा खोळंबाच्या घटना सातत्याने वाढीस लागलेल्या आहेत. मागील वर्षी १२ महिन्याच्या कालावधीत ठाण्यात महामार्गावर तब्बल २०४ ऑईल साडण्याच्या घटना घडल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली. ठाणे शहरात महापालिका हद्दीतून अनेक राज्य महामार्ग जात आहेत. घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक, नाशिक-मुंबई महामार्ग आहेत. मोठ्या वाहनांची वर्दळ या महामार्गावर सातत्याने असते. यावेळी धावत्या वाहनातून रस्त्यावर ऑईल पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत.
सन २०२३ या वर्षात ऑईल सांडण्याच्या २०१ घटना...
सन २०२३ या वर्षात ठाणे महापालिका हद्दीतील महामार्गावरील रस्त्यावरुन धावणाऱ्या वाहनातून पडलेल्या ऑईलमुळे लहान-मोठे अपघात झालेले आहेत. ‘ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन'च्या टीमने वर्षभरात तब्बल २०१ ठिकाणी सांडलेल्या ऑईलवर माती टाकण्याची कामगिरी बजावलेली आहे. रस्त्यावर ऑईल पडण्याच्या सर्व्राधिक २४ घटना जानेवारी आणि फेब्रुवारी, २०२३ या महिन्यात घडल्या. त्या खालोखाल डिसेंबर महिन्यात २० घटना घडल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडीत भर पडते. तर ऑईल पडल्याने रस्त्यावर वाहने घसरुन अपघाताच्या घटनाही घडतात; दुचाकी स्लिप होऊन गंभीर अपघात घडले आहेत. मात्र, अशी घटनेवेळी ‘महापालिका आपत्ती व्यवस्थापन'चे पथक घटनास्थळी पोहोचून वाहतूक दुसरीकडे वळवून ऑईलवर माती टाकून नंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करुन दिला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यसिन तडवी यांनी दिली.